Friday, April 17, 2020

यशवंत बँकेच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्य व मास्कचे वाटप...


अजिंक्य गोवेकर
कराड-
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या संकल्पनेतुन गरजु लोकांना अन्नधान्य व त्यासोबत कापडी मास्कचे वितरण येथील यशवंत बँकेच्या माध्यमातून नुकतेच करण्यात आले. ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही व जे परराज्यातील आहेत त्याना हे वाटप होत असल्याचे प्रामुख्याने सांगण्यात आले. या किटचे वितरण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय डोईफोडे, जेष्ठ संचालक चंद्रकांत चव्हाण, अधिकारी रुपेश कुंभार, कराड शाखा सह व्यवस्थापक सदानंद कुलकर्णी, अक्षय गरुड, श्रीकांत कांबळे, श्रीधर ग्रामोपाध्ये, प्रणव कदम, विशाल थोरात, संदीप अलटकर, प्रसाद सपाटे व कर्मचारी आदी उपस्थित होते.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शार्दुल उर्फ मुकुंद चरेगांवकर, घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के, किरण मुळे, समाधान चव्हाण, उमेश शिंदे, सिद्धार्थ थोरवडे, ललित राजापुरे, रमेश मोहिते, सुनिल जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment