Saturday, June 6, 2020

कृष्णा हॉस्पिटल मधून 23 जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 6 : सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 23 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 144 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कराड तालुक्यातील म्हासोली येथील 27 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरूष, कलेढोण येथील 45 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 35वर्षीय पुरूष, मोरगिरी-पाटण येथील 72 वर्षीय महिला, दहिवडी-माण येथील 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, देगाव-वाई येथील 42 वर्षीय महिला, धामणी येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक, 35 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय पुरूष, मालनपूर-चिखली-वाई येथील 24 वर्षीय युवक, सिधांतवाडी-वाई येथील 52 वर्षीय पुरूष, मानेचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, आढे-पाटण येथील 35 वर्षीय पुरूष, म्हावशी-पाटण येथील 45 वर्षीय पुरूष, कास-खुर्द येथील 44 वर्षीय पुरूष, शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिराळ-पाटण येथील 52 वर्षीय महिला, तामिनी-पाटण येथील 7 वर्षीय मुलगी, मोरगिरी-पाटण येथील 65 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संतोष टकले, डॉ. राहुल फासे, राहुल माळी, अवधूत अवसरे, श्रीनिवास जोशी, विशाल पाटील, इम्रान इनामदार, रश्मी पंढरपुरे, दीपाली धोत्रे, वनिता नावडकर, श्रीपाद खुपसंगीकर, अस्मिता देशपांडे, नंदिनी चव्हाण, महेंद्र आलाटे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर,डॉ. विश्वास पाटील, विक्रम पवार यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

आज एकूण 43 कोरोना मुक्त
 जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर खावली येथून 6 व मायणी येथून 2 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यासाठी  चांगली ठरत चाललेली बाब म्हणजे आज अखेर उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असून ती  303 इतकी आहे.
बरे होऊन घरी गेलेल्या मध्ये खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील 51 व 70 वर्षीय 2 पुरुष, सातारा तालुक्यातील निंब येथील 30 वषी्रय पुरुष,  जावळी तालुक्यातील मोरघर येथी ल 24 वर्षीय महिला व 3 वर्षीय बालक, आणि खटाव तालुक्यातील बनपूरीतील 38 वर्षीय पुरुष व शेळकेवाडी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रात्री 8 पर्यंत जिल्ह्यातील कोरोना अपडेट असे आहे, एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 620 इतकी झाली असून 6835 नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.  एकूण बाधित रुग्णांपैकी 303 इतके बाधित रुग्ण बरे पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  तर 291 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या 26 इतकी आहे.
000

No comments:

Post a Comment