सध्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत 50 वर्षावरील नागरिकांच्या शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण,हदयाचे ठोके आदी तपासणी वार्ड क्रमांक 14 मध्ये नुकतीच करण्यात आली. सदरची तपासणी ही कार्वे नाका, पोस्टल कॉलनी व खराडे कॉलनी या भागातून करण्यात आली. त्याप्रसंगी युवा नेते श्री राहुल खराडे यांनी आपला सहभाग नोंदवला.
राहुल खराडे हे जनतेत मिसळून काम करणारे म्हणून परिचित आहेत.लॉक डाऊन काळात त्यांनी चांगले काम केले आहे.गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप,किराणा माल चे वाटपत्यांनी केले आहे. तसेच सॅनिटायझर व मास्कचेही वाटप त्यांनी केले आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे रुग्णांना दवाखान्यात बेड मिळण्यास मदतही झाली आहे.सध्या प्रशासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान ते स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या वार्डात राबवत आहेत. त्या ठिकाणी जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. हे अभियान राबवले जात असल्याने त्याठिकाणी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी नगरपरिषदेचे अभियंता रणजीत भोसले, तसेच सौ वैशाली लादे, सौ सारिका थोरवडे, राजेंद्र ढेरे,मुकादम, नाना सोनवणे सुरेश खराडे, भास्कर मोहिते काका, दीपक दादा काकडे, दिगंबर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment