Tuesday, September 8, 2020

कराडात येत्या शनिवारपासून मोफत "कोरोना केअर सेंटर' होणार सुरू ; सातारा जिल्हा भाजपा व विक्रम पावसकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

कराड
सातारा जिल्हा भाजपा व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने  येथील मंगळवार पेठेतील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोरोना उपचार सेंटर येत्या शनिवार दि.12 पासून लोकांच्या सेवेत सुरू होणार आहे. येथील सह्याद्री हॉस्पिटल शी याबाबत त्यांचा करारही झाला आहे.सध्याच्या अडचणीच्या काळात पावसकर मित्र परिवाराने घेतलेल्या या उपक्रमाचे सम्पूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

समाजासाठी काम करायचे असेल तर एखादे मंत्रिपद पाहिजे,किंवा सत्तेतच असले पाहिजे असं काही नसतं,तर विधायक कार्यासाठी धडपड करायची प्रवृत्ती आणि अडचणीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी धावून जाण्याचे धाडस या दोन गोष्टी लागतात.भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे याच पठडीतले. लोकांशी थेट नाळ असल्याने  नेहमीच सामाजिक कार्यात शहरातून अग्रेसर दिसतात. मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे.गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप,भाजीपाला वाटप,पी पी इ किट चे वाटप,प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी समाजासाठी या कोरोना काळात राबवले आहेत. मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे.अनेक गरीब वस्तीत त्यांनी किराणामालाचे वाटप केले आहे.घरोघरी जाऊन लोकांचे टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगही त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.  कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आली आहे.त्यांनी "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पनादेखील गणेशउत्सवाच्या पार्शवभूमीवर यशस्वीरीत्या राबवली आहे.
सध्या कोरोनाच्या संकटाने सम्पूर्ण जिल्हा होरपळलेल्या अवस्थेत आहे.सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल आहेत.घरातच अनेकजण उपचार घेत आहेत अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात आहे. व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत आहेत.रुग्ण दगावण्याचा रेशीओ देखील वाढला आहे अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला आहे.त्यांच्या वतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहत आहे.त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार मोफत मिळणार आहे. येथील सह्याद्री हॉस्पिटलशी त्यांचा याबाबतचा करारही झाला आहे. अडचणीवेळी समाजासाठी धावून येण्याच्या त्यांच्या याच बांधिलकीचे नेहमीप्रमाणे याहीवेळी सम्पूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.इतरांनीही याचा आदर्श घ्यावा अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment