Tuesday, October 20, 2020

प्रभाग क्रमांक 14 मध्ये स्वच्छता अभियानास सुरवात... नगरसेविका सुप्रिया खराडे यांनी नोंदवला सहभाग...

कराड
येथील नगर परिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सलग दोन वर्ष देशात प्रथम क्रमांक आला या वर्षीसुद्धा प्रथम क्रमांक यावा यासाठी शहरातील सर्वजण प्रयत्न करीत आहेत. नगरपरिषदेतर्फे गेली चार दिवस प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुमंगल नगर येथे स्वच्छता अभियान चालू आहे त्यासाठी आज नगरसेविका सौ सुप्रिया तुषार खराडे तसेच युवा नेते श्री राहुल खराडे यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले व स्थानिक नागरिकांना सहभागी करून याबाबत माहिती दिली. 
नगरसेविका सौ सुप्रिया खराडे यांनी सध्याच्या कोरोना संकटात प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करत लोकांना सहकार्याचा हात दिला आहे.जनतेच्या आरोग्याची काळजी घेत खराडे कुटुंबीयांनी प्रभागातुन नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. अनेकांना अत्यावश्यक मदत देखील या कुटुंबाने केली आहे आणि लॉक डाऊन काळात गरजुच्या पाठिशी उभे राहून आपली बांधिलकी जपलीही आहे. दरम्यान,सध्या सुरू असलेले स्वच्छता अभियान प्रभाग क्रमांक 14 मध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका सुप्रिया तुषार खराडे यांनी यावेळी दिली.
त्याप्रसंगी तेजस्वी खराडे, सौ गायकवाड, सौ मुल्ला, सौ पाटील, मनोज पाटील, श्री पवार सर, श्री गायकवाड सर, बद्रुद्दिन मुल्ला,अमीर  मुल्ला मुकादम श्री प्रमोद कांबळे ठेकेदार, सागर लादे व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment