स्वच्छ सर्वेक्षण विषयावरून सी ओ डाके यांनी पत्र व्यवहार करत याविष्याला खडबडून जागे केल्यानंतर येथील पालिकेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या दोन पत्रकार परिषदा शहराला काही दिवसांपूर्वीच ऐकायला मिळाल्या.आणि त्यातील नगराध्यक्षांच्या झालेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी जनशक्तीच्या भूमिकेवरच टीकेची झोड उठवत आघाडीला घरचा आहेर दिल्याने जनशक्ती आघाडीत बिघाडी होऊन ती आता फुटल्याचे याचनिमित्ताने लोकांसमोर आले आहे. याविषयीची शहरात चर्चा सुरू आहे.
शहराचे राजकारण गेले अनेक दिवस वेगवेगळ्या वळणावर आपली वाट काढताना दिसत आहे.मागील पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाहीला अचानक रामराम करून आ पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाला मानत नगरसेंवक राजेंद्र यादव,व जयवंत पाटील हे दोघे नेते शहराचे राजकारण करण्याकरिता सरसावले होते.यादव यांची यशवंत विकास आघाडी व जयवन्त पाटील यांची लोकसेवा आघाडी असे दोन्ही मिळून जनशक्तीच्या बॅनर खाली एकत्र आले. दरम्यान येथील पालिका निवडणुक त्यानंतर पार पडली आणि त्या निवडणुकीतून राजेंद्र यादव यांचा पराभव झाल्याचे समोर आले. या पराभवाचे खापर आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर फुटले, त्याचवेळी त्यांच्यापासून आपले सरकारी बरोबर घेऊन हे दोघे वेगळे झाले व पृथ्वीराजबाबा याना एकटे पाडत,स्वतंत्रपणे,एक विचाराने येथील पालिकेचे राजकारण जनशक्तीचे नेते म्हणून करताना दिसले.त्याच दरम्यान यादव समर्थक नगरसेवकाला पालिकेचे उपनगराध्यक्ष पद मिळणार अशी शहरात जोरदार चर्चा होऊ लागली.मात्र तसे का झाले नाही... याचे कारण शहराला अद्याप समजलेच नाही... त्यानंतर खऱ्या अर्थाने उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व यादव गटामधील धुसफूस अधिक वाढू लागल्याचे शहराला जाणवू लागले. दरम्यान झालेल्या यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीतून पृथ्वीराज बाबांना पराभूत करण्यासाठी राजेंद्र यादव व जयवंत पाटील हे दोन नेते "जी जान से' लढले...पण शहराने पृथ्वीराजबाबाना उचलून धरल्याचे मतदानातून दिसून आले.एवढे सगळे नगरसेवक अतुलबाबांच्या पाठीशी होते तरी त्यांना शहरात पिछाडीवर का राहावे लागले याचे सर्वानाच आसचर्य वाटणे साहजिकच होते... मात्र...येथील पालिकेच्या राजकारणाला या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने वेगळे वळण लागले. म्हणजेच, राजेंद्र यादव यांचा नगरपालिकेतील वावर पहिल्यापेक्षा अचानकपणे अधिक वाढला.पार्टीतील त्यांना मानणारे नगरसेवक फक्त त्यांच्या भोवतीच दिसू लागले. तर, जयवंत पाटील यांच्या केबिनमध्ये त्यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक स्वतंत्रपणे वावर करताना दिसू लागले.कुठेतरी पार्टी अंतर्गत इराजकारण घडत असल्याचे यानिमित्ताने लोकांना जाणवु देखील लागले होते. त्यातच मुख्याधिकारी डांगे हे आपलं ऐकत नाहीत अस जेव्हा खुद्द उपनगराध्यक्ष म्हणाले तेव्हा सी ओ डांगे सत्तारूढ गटाच्या एकाच नेतृत्वाचे ऐकत असल्याचे सर्वांसमोर आले. म्हणजेच पार्टीत दुफळी निर्माण झाल्याचे त्याचवेळी उघड झाले होते. उपाध्यक्ष जयवंत पाटील हे, सी ओ डांगे आमच्या पार्टीत भांडणे लावत आहेत,तेच आमची पार्टी चालवत आहेत...असा आरोप करत पार्टी अंतर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे आपला निशाणा साधताना वारंवार दिसत होते...मात्र त्यांनी पार्टी अंतर्गत धुस्फुसीला चव्हाट्यावर आणले नव्हते... उघड विरोधदेखील त्यांनी आजपर्यंत दर्शवला नव्हता...मात्र,काही दिवसांपूर्वी शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण विषयावरून जनशक्तीने नगराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली होती,त्यावेळी जनशक्तीच्या बाजूने जयवंत पाटील त्या पत्रकार परिषदेला उपस्थित दिसले नाहीत...कदाचित त्यांना त्यांच्या पार्टीकडून आमंत्रण नसेलही...मात्र ते दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या बाजूने पत्रकार परिषदेतून जनशक्तीच्या विरोधात टीका करताना दिसले....जनशक्तीने सी ओ डांगे याना फ्री हॅन्ड दिला होता..तर मग डांगे याना झालेल्या भ्रष्टाचाराबाबत याच लोकांनी जाब का विचारला नाही...? नगराध्यक्षा सह्या करताना जे सी बी च्या भरमसाठ आलेल्या बिलावर सह्या कशा करणार..? डांगे यांनी दोन मोठी बिले परस्पर सह्या करून काढल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते...स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही सांगत त्यांनी जनशक्ती च्या भूमिकेशी आपली फारकत असल्याचे दाखवून दिले होते, त्याचवेळी जनशक्तिमधील धुसफूस फुटीच्या रूपाने शहरासमोर आली.
अस...नेमक काय घडलंय...? की ज्यामुळे जनशक्तिमध्ये फुट पडली...?... हे थोड्या दिवसात कराडला कळेलच ...मात्र, पालिका निवडणुकीला काही महिने बाकी असताना शहराचे बदललेले हे राजकारण आता नव्याने कोणत्या जुळवाजुळवीला लागणार? हेही यापुढे पहावे लागेलं.
No comments:
Post a Comment