कराड
येथील पालिकेतील जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने शाळा क्रमांक 3 मध्ये आजपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला.यावेळी विजय यादव, निशांत ढेकळे, ओमकार मुळे, राजेंद्र डुबल, बापू देसाई, नरेंद्र लिवे संदीप मुंडेकर, परेश माने, प्रमोद पवार नगरपरिषदेचे भालदारसाहेब, डॉ सोळंखी,शशिकांत घोडके आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी लोकांचा मोठा प्रतिसाद या मोहिमेस मिळाल्याचे दिसून आले.
आज सकाळपासूनच येथील शाळा क्रमांक 3 मध्ये गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू झाले सोशल डीस्टन्स चे पालन करत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या मोहिमेस प्रारंभ झाला लसीकरणास येणाऱ्या प्रत्येकाचे गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आले शहर व परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला आज पहिल्याच दिवशी तब्बल शंभर लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याची माहिती याठिकाणी देण्यात आली यावेळी राजेंद्र यादव म्हणाले सध्या कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरू आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हा नक्कीच पर्याय आहे सर्वांनी लसीकरण करून घेऊन आपण व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले
No comments:
Post a Comment