Thursday, June 24, 2021

राज्यात पुन्हा लागू होणार कडक निर्बंध...?डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये म्हणून घेतली जाणार खबरदारी ? तिसऱ्या लाटेचीही आहे भीती...

कराड
वेध माझा ऑनलाइन
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजते.

कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली होती.
दर आठवड्याला परिस्थितीनुसार निर्बंध कमी जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सध्या राज्यात आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत असे समजते तसेच गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

No comments:

Post a Comment