कराड
येथील भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप यांनी त्यांचे वडील शिवाजीराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विहार करणाऱ्या विविध पक्षांसाठी 25 घरटी बनवून त्या पक्षांसाठी विश्रांतीगृह ही अनोखी संकल्पना राबवली आहे पक्षांसाठी निवारा व खाण्यासह त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय त्याद्वारे बाराही महिने करण्यात येणार असल्याचे सुहास जगताप यांनी सांगितले...
सध्याच्या युगात पशु पक्षावरील प्रेम फार कमी जणांकडून व्यक्त होताना दिसते... धावपळीच्या जगात प्राणी व पक्षी यांच्याबद्दल आपलेपणा वाटायला लोकांना वेळ आहे कुठे ? प्रत्येकजण आपल्यापुरता व्यवहार बघतो असे चित्र सगळीकडेच असतांना दुसरीकडे मात्र काहीजण समाजाबरोबर या प्राणी व पक्षांचाही माणूस म्हणून विचार करतात याचाही प्रत्यय सध्या येताना दिसतोय..
येथील नगरसेवक सुहास जगताप यांचे वडील शिवाजीराव जगताप हे कराडमधील स्टॅम्प व्हेंडर अप्पा या नावाने परिचित आहेत त्यांचा आज 72 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक सुहास जगताप यांनी आज अनोखा उपक्रम राबवत हा वाढदिवस साजरा केला...त्यांनी हवेतून विहार करणाऱ्या विविध पक्षांसाठी निवारा व खाण्या-पिण्याची सोय करण्याच्या हेतूने "पक्षी विश्रांती गृह' ही संकल्पना राबवली आहे... त्यासाठी त्यांनी एकूण दीड बाय दोन या आकाराची 25 प्लायवूडची घरटी बनऊन घेतली आहेत...आणि ती सोमवार पेठेतील चौकाचौकातून सुरक्षित ठिकाणी ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले... जेणेकरून या पक्षांना विहार करत करत त्याठिकाणी अधून मधून थांबून तेथे ठेवलेले खाद्य खाता येईल व पाणी पिता येईल... या पक्षांच्या भुकेचा प्रश्न मिटण्यास काहीअंशी त्यामुळे थोडातरी हातभार लागेल... असे जगताप यांनी या संकल्पाबद्दल बोलताना सांगितले...
त्यांनी शहरात राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय सुहास जगताप नुकतेच कोरोना मुक्त झाले आहेत त्यांनी राबवलेला हा उपक्रम सध्या शहरातून सगळीकडे चर्चेत आहे...
No comments:
Post a Comment