Monday, December 6, 2021

राष्ट्रवादीकडून शिवेंद्रराजेचा पत्ता कट... रामराजेंची खेळी यशस्वी !; शिवेंद्रराजेना अध्यक्षपदासाठी होता विरोध ! ; शशिकांत शिंदेंना पराभूत करणे पडले महागात!

वेध माझा ऑनलाइन 

कराड 

राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव- पाटील यांच्या गळ्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांच्या नावावर सहमती झाली. सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातल्या विरोधाची हवा पाहता, तसेच राष्ट्रवादीमधून असलेला विरोध लक्षात घेत शरद पवार यांचा नाईलाज झाल्याचं समजत

शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करुन दोघांच्या खांद्यावर पुढील जबाबदारी सोपवली होती. रामराजेंनी स्वत:ची खेळी खेळत शिवेंद्रराजेंची मनधरणी करत राष्ट्रवादीचाच संचालक अध्यक्ष बनवला. अध्यक्षपदासाठी नितीन जाधव पाटील आणि उपाध्यक्षपासाठी अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील मुख्य नेत्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र शशिकांत शिंदेंचा जिल्हा बँकेतील पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांचा शिवेंद्रराजेंच्या नावाला झालेला विरोध हाच आमदार शिवेंद्रराजेंच्या अध्यक्षपदासाठी विरोध ठरला, अशीच चर्चा आता जिल्ह्यातील राजकीय गोटात होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment