वेध माझा ऑनलाईन - आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारीपासून कोविन अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी नोंदणी सुरु झालं. या लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय.दरम्यान कराडातही आजपासून लसीकरण सुरू होणार आहे येथील टाऊन हॉल येथे तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व उपकेंद्रावर ही लस सोमवारी आणि शुक्रवारी मुलांना देण्यात येणार आहे
सम्पूर्ण देशभरातून रविवारी 11 वाजेपर्यंत 8 लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर प्रसाशनाकडून त्याची पूर्ण करण्यात आली आहे. तसंच 1 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान कराडातही आजपासून लसीकरण सुरू होणार आहे येथील टाऊन हॉल येथे तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व उपकेंद्रावर ही लस सोमवारी आणि शुक्रवारी देण्यात येणार आहे यावेळी विद्यार्थ्यांनी येताना ओळखपत्र,आधारकार्ड सोबत आणायचे आहे.
अशी करा नोंदणी...
पहिलं Covin App वर जा.
तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर, नाव टाका.
त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.
सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जवळपास 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण दिलं आहे. तसंच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे.
यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे.ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुलंच या लसीकरणासाठी पात्र आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागेल. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्रानं दिला आहे.
No comments:
Post a Comment