वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देखील मिळाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काल राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले होते. आज त्यांनी पुन्हा तसे संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं आहे.
राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहे. राज्यात दुसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलंय. दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत त्यांनी ती वाढवावी, असंही पवारांनी सांगितलं. अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला
अजित पवार म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे, असं ते म्हणाले. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी 50 पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमाला जाणार नाही,असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. कारण आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार. राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं.
महाराष्ट्रात सगळ्यांनी लस घ्यावी. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. पहिला डोस देण्यात यश आलं आहे. दुसऱ्या डोसला ग्रामीण भागात प्रतिसाद नाही. घराघरात जाऊन लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, असंही पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment