वेध माझा ऑनलाइन - पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत 20 लाखांची खंडनी मागितली आहे. मागील जवळपास दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरून 'फेक कॉल अॅप' नावाचं अॅप डाऊनलोड केलं होतं. संबंधित अॅपचा वापर करत आरोपींनी अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरला होता. तसेच आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलतोय असं सांगून 20 लाखांची खंडणी मागितली होती. गेल्या दहा दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडे वीस लाखाची खंडणी मागून त्यांच्याकडून आतापर्यंत दोन लाख रुपये उकळले आहेत.
No comments:
Post a Comment