वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्यासमोर एखादी व्यक्ती चुकली, मग ती व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता सुनावलेले खडे बोल, निर्णय क्षमता आदी बाबींमुळे राष्ट्रवादीसह मित्र पक्ष आणि विरोधी पक्षातही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा कार्यकर्ताच नाही तर नेतेमंडळीही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.
जयकुमार गोरेंकडून अजितदादांचं कौतुक
दादांचं काम, दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय विचार आमचे विरोधात असतील पण मामा, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांचा फॅन आहे. मला सांगायला काही अडचण वाटत नाही, आमचं राजकीय जमतं का तर जमतंच नाही. पण दादांची शिस्त, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा… दादांचं दादांकडेच आहे दुसऱ्या कुणाकडे नाही, अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलंय.
दत्तामामांकडून जयकुमार गोरेंना ऑफर
गोरे यांनी अजितदादांचं कौतुक केल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यावर कोटी केली. भाऊ, तुम्ही ज्याप्रमाणे आज दादांचं कौतुक केलं. भाऊ तुमच्याही कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. तुम्हीपण हाडाचा कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करता. पण भाऊ ठिक आहे चुकतो तोच माणूस असतो. आज आमच्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही एवढा चांगला केलाय. असाच चांगला विचार भविष्यात करा, अशी सल्लावजा ऑफरच दत्तामामांनी जयकुमार गोरेंना दिलीय.
No comments:
Post a Comment