वेध माझा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे नागरिकही निश्चिंत झाले होते आणि नागरिकांनी नव वर्ष धुमधडाक्यात साजरं केलं. परिणामी गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात 1800 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 9 दिवसांपूर्वी दरदिवसाला 80 ते 100 रुग्ण सापडत होते. मात्र आज हा आकडा थेट 1800 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन केलं आहे.
No comments:
Post a Comment