वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे तर दुसरीकडे ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर सांगलीमध्ये 56 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 92 विद्यार्थिनींना कोरोना लागण झाली होती,त्यापैकी 56 विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची लागण झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. सध्या सर्व मुलीही कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. पण त्यांचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आज शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या 92 विद्यार्थिनींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.सुरुवातीला एका विद्यार्थिनीला कोरोना लागण झाली, त्यानंतर तिच्या रूममेट असणाऱ्या नऊ विद्यार्थिनींना कोरोना लागण झाली. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये जवळपास 92 विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना 30 डिसेंबर रोजी कोरोना झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्या सर्व विद्यार्थ्यांना मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांची ओमायक्रॉन टेस्ट करून, पुण्याला नमुने पाठवण्यात आले होते. दरम्यान 14 दिवसांच्या उपचारानंतर सर्व 92 जण कोरोना मुक्त झाल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र आता या 92 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थिनींची ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदरचा रिपोर्ट आज शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला, त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण या सर्व विद्यार्थिंनींची तब्येत ठणठणीत असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.
No comments:
Post a Comment