कराड
आमदार नितेश राणे यांना कोर्टाचा आदेश असल्याने बुधवार पर्यंत अटक होणार नाही त्यानंतर मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळवून देणाऱ नाही तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक ही होणारच असे राज्याचे गृहमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आज येथील विश्रामगृह येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ठामपणे सांगितले दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान असल्याचे त्यांनी सूतोवाच केले होते त्याविषयी पुन्हा बोलताना आपण त्यांना नारळावर कुस्ती खेळणारे असे म्हटले होते पण मला सांगितले गेले की बत्ताशावर पण कुस्ती होते मग मी त्यांना बत्ताशावरचे पैलवान म्हटलो अशी कोपरळली मारत त्यांनी यावेळी सर्वांशी विविध विषयांवर मोकळा संवादही साधला
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी ते आज येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते
राज्यात कोविड ची परिस्थिती गंभीर होत चालली असून त्याची रोजची आकडेवारी कोरोनाचा गंभीरपणा निदर्शनास आणून देत आहे कोरोनाचे राज्यात पेशंट वाढत आहेत काळजी घेतली पाहिजे राज्यातील आमदार मंत्री देखील बाधीत झाले आहेत कोरोनाला कोण मंत्री आहे किंवा नाही हे कळत नाही तो नियम पाळले नाही की कोणालाही होऊ शकतो असे ते यावेळी म्हणाले
राज्यात सरकारने आजपासून जे निर्बंध जारी केले आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहीजे लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी घ्या... असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी तोंड वर काढत असल्याचे चित्र निर्माण होऊ पाहत आहे याबाबत बोलताना ते म्हणाले काही घटना जिल्ह्यात मधल्या काळात घडल्या असल्या तरी पोलिस आपले काम चोख करत आहेत पाटण तालुक्यात चिमुरडीवर अत्याचाराची जी दुर्दैवी घटना घडली आहे त्यातील आरोपीला फाशी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तो आरोपी विकृत मानसिकतेचा असल्याचेही ते यावेळी म्हणाले
एकीकडे कोविड वाढत असल्याचे चित्र सगळीकडे असताना नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यातील निवडणुकाकडे त्यांचे लक्ष वेधले असता तो निर्णय केंद्राने जाहीर केला असल्याने त्या-त्या राज्याने निवडणुका व्हाव्या किंवा होऊ नये यासाठी तिथल्या परिस्थिती नुसार केंद्राशी बोलले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप ची जवळीक दिसली आणि राज्यात राष्ट्रवादिबरोबर सत्तेत असणारा शिवसेना पक्ष राष्ट्रवादीपासून लांब दिसला याबाबत विचारले असता आता हा विषय सम्पला आहे मी त्याचवेळी याविषयीचे माझे मत व्यक्त केले आहे असे म्हणत ना देसाई यांनी राष्ट्रवादीवर टीका करणे आवर्जून टाळले
दरम्यान माझे आणि कराडच्या पत्रकारांचे स्नेहाचे सम्बन्ध आहेत ते अधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी मी पत्रकार दिनाचे औचित्य साधून कराडच्या पत्रकारांना शुभेचह्य देण्यासाठी आलो आहे असे सांगत त्यांनी पत्रकारांना यावेळी शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment