वेध माझा ऑनलाइन - शहरातील बापूजी सांळुखे पूतळा परिसरात असणाऱ्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली ती इतकी भयानक होती की त्यामध्ये 24 घरे जळून खाक झाली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी पसरली मात्र यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही कालांतराने ही आग आटोक्यात आणण्यात आली
उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. प्रशासक सी ओ डाके यांनी देखील त्या ठिकाणी धाव घेतली घरे जळालेल्या पीडित लोकांची तेथील शाळा क्रमांक 3 मध्ये राहण्याची सोय केली आहे नगरपरिषदेच्या व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला
No comments:
Post a Comment