वेध माझा ऑनलाइन - भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न 92 वर्षीय लता मंगेशकर यांची प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या लता मंगेशकर यांची चिंताजनक झाली आहे. गेल्या 27 दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत.नुकतेच त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढण्यात आलं होतं. पण आज पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे. आता त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतुत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना तातडीनं व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक 24 तास रुग्णालयात हजर असतं.
6-7 दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढलं होतं
लता मंगेशकर यांना 6-7 दिवसांपूर्वी डॉक्टरांनी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकलं होतं. तेव्हा डॉक्टर प्रतित समधानी यांनी सांगितले होतं की, त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकण्यात आलं आहे. मात्र ते आयसीयूमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
No comments:
Post a Comment