सातारा दि (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 नागरिकाचा अहवाल कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 1 माण 0महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 0वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे आज अखेर एकूण 1 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 3 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आज 460 रुग्णांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू...
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नव्हता. राज्यात गेल्या 24 तासात 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
No comments:
Post a Comment