वेध माझा ऑनलाइन - इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन आता दोन दिवसांवर आला आहे. 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. त्या स्पर्धेसाठी सर्व टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ मुंबईत दाखल झाला आहे. यंदा आयपीएलमधील साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) एकाला अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यानं वानखेडे स्टेडिअम नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडिअमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली आहे. 'फ्रि प्रेस जर्नल'नं हे वृत्त दिलं आहे.
ATS ला मिळालेल्या माहितीनुसार सर्व स्टेडिअम तसेच खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर सामनाअधिकारी, अंपायर तसंच अन्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. मॅचच्या दरम्यान हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष टीमला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment