वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची णि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि 21 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.
कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची णि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment