वेध माझा ऑनलाइन - आज देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य लोकांना झळ बसणार आहे. तर, दुसरीकडे काही ग्राहकांना दिलासादेखील मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी आयओसीने व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या गॅस सिलेंडर दरात कपात केली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडर नवे दर
मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1963 रुपये इतका होता. आता हाच दर 1954 रुपये झाला आहे. कोलाकातामध्ये याआधी 2095 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर 2087 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईतही व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात घट झाली आहे. चेन्नईत याआधी 2145 रुपयांना हा सिलेंडर मिळत होता, हा सिलेंडर आता 2137 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती वापराचा एलपीजी महागला
देशात घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.
No comments:
Post a Comment