Thursday, March 10, 2022

उत्तर प्रदेशात मुस्लिम समाजाची मते मिळवण्यात भाजप यशस्वी ठरले का?उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रंजक आकडेवारी आली समोर...

वेध माझा ऑनलाइन -  उत्तर प्रदेशात मुस्लिमांमध्ये भाजप विरोध  खरंच संपला आहे का? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर अनेक रंजक आकडेवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काऊंटिंगमध्ये सायंकाळी 3 वाजेपर्यंत भाजप 126 जागांवर पुढे होती. जे आकडे मुस्लिम बहुल भागातील असल्याचं सांगितलं जात आहे.

उत्तर प्रदेशातील मुस्लिम बहुल जिल्हे...

उत्तर प्रदेशात अमरोहा, बुलंदशहर, बरेली, बदायू, बागपत, बहराइच, लखनऊ, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बाराबंकी, पीलीभीत, सहारनपुर, श्रावस्ती, रामपुर, मुजफ्फरनगर, बिजनोर, संत कबीर नगर, खीरी, गाजियाबाद, मेरठ, सुल्तानपुर, मुरादाबाद आदी जिल्हे मुस्लीम बहुल असल्याचं मानलं जातं. या 22 जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे. आणि या भागातील मुस्लिमांचं मत निर्णायक मानलं जातं.

सायंकाळी 3 वाजेपर्यंत या जागांवर भाजप पुढे...

सायंकाळी 3 वाजेपर्यंत या 22 जिल्ह्यांच्या 126 जागांवर भाजप पुढे जात होती. यात अनूपशहर सीट, आंवला, बागपत, बहराइच, बख्शीचा तलाव, बल्हा, बलरामपुर, बंसी, बरेली, बरेली कँट, बरहा पुर, बरखेड़ा, भोजीपुरा, बिजनोर, बिलारी, बिल्सी, बिसालपुर, बुलंदशहर, चरथावल, दरियाबाद, दातागंज, डिबाई, देवबंद, धामपुर, धंगटा, धौरहा, फरीदपुर, गँसारी, गंगोह, गाजियाबाद, गोला गोकर्णनाथ, हैदरगण, हसनपुर आणि हस्तिनापुर मतदारसंघावर भाजप आघाडीवर होती.

या जागांवर आघाडी..

अशा प्रकारे इसौली, इटवा, कदीपुर, कैसरगंज, कस्ता, खतौली, खुर्जा, कुर्सी, लखीमपुर, लंभुआ, लोनी, लखनऊ कैंट, लखनऊ ईस्ट, लखनऊ वेस्ट, महासी, मलिहाबाद, मीरगंज, मेरठ, मेरठ कैंट, मोदी नगर, मोहम्मदी, मुरादनगर, निगहसन, पलिया, पीलीभीत, पुराणपुर, राम नगर, रामपुर मनिहार, सदर, सहसवान, साहिबाबाद, सरधना, सरोजिनी नगर, शेखुपुर, शिकारपुर, श्रीनगर, स्याना, तुलसीपुर आणि उतरौलामधून भाजप आघाडीवर होती.

समाजवादी पार्टीची इच्छा अपूरी..

या सर्व जागा मुस्लिम बहुल असल्याचं मानलं जातं. अशात या जागांवर भाजप आघाडीवर असणं राजकारणात मोठा संकेत मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, या सर्व जागांवर काही प्रमाणात मुस्लीमांची मतंही भाजपला गेली आहेत. ज्यामुळे सपाची सत्ता मिळवण्याचं स्वच्छ अधूरं राहिलं.

No comments:

Post a Comment