Sunday, April 3, 2022

विंग परिसरात घोडा आणि शिंगरूचा बिबट्याने पाडला फडश्या ; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती...

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील विंग परिसरातील विंग कणसे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या शिंगरूचा मृत्यू झाला आहे घोडा आणि शिंगरूचा फडश्या बिबट्याने पाडला त्यामुळे तेथील मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान याबाबत वनविभागाने पंचनामा केला आहे तरी बिबट्याचे हल्ले थांबणार तरी कधी असा शेतकऱ्यांचा आक्रोश सध्या सुरू आहे

घटनास्थळावरून वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बाराच्या दरम्यान कराड तालुक्यातील विंग मधील कणसे मळा येथे जगन्नाथ महादेव होगले यांच्या गट नंबर 759 या शिवारामध्ये मेंढपाळांच्या घोड्यांवर बिबट्याने हल्ला केला.. बिबट्याच्या हल्ल्यात एक घोडा ठार झाला.. दरम्यान तीन दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केल्याने शिंगरू जखमी झाले होते.. या शिंगरुचाही शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.. घोडा व सिंगरू दोन्हींचाही मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.याठिकाणी वनरक्षक रमेश जाधवर यांनी पंचनामा केला आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावावा अशी मागणी होत आहे

No comments:

Post a Comment