वेध माझा ऑनलाइन - बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून कराड रोटरी क्लबच्या वतीने विविध उपक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते
अर्थमित्र रविंद्र देशमुख आणि आय सी आय सी आय म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, दक्षिण तांबवे याठिकाणी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन कऱण्यात आले होते . या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.
याप्रसंगी रोटरी क्लब कराडचे सेक्रेटरी चंद्रशेखर पाटील, लिटरसी डायरेक्टर गजानन माने, प्रोजेक्ट चेअरमन रविंद्र देशमुख, शिवराज माने, राजेंद्र कुंडले, अनघा बर्डे व सुप्रित यादव व शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिका शाळा क्र. ७ व अगंणवाडी क्र.८० येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याठिकाणी बालरोग तज्ञ डॉ. मनोज जोशी यांनी ६० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी राजीव खलीपे व शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. तसेच कै.काशिनाथ नारायण पालकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले . या शिबिरामध्ये बालरोग तज्ञ डॉ. श्रुती शहा यांनी ४५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी शाळेच्या संचालिका सौ.वैशाली पालकर, सौ सीमा पुरोहित तसेच शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment