वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची यामुळे अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी झाल्याचं स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिलेत. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमीका दोन्ही परस्पर विरुद्ध असल्यामुळे राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेलं वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता, हा विषय नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमच्या भूमीकेवर ठाम आहोत आणि राहणार. आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले दरम्यान, महाविकास आघाडीत फूट पडू शकते असही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला आहे.
No comments:
Post a Comment