वेध माझा ऑनलाइन - कराडच्या शाहु चाैकातील जय महाराष्ट्र मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी 78 हजार रुपये किंमतीच्या साहित्य व मोबाईल हॅन्डसेटची चोरी केली होती याबाबतची फिर्याद दिपक सोनाराम पुरोहीत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात वैभव वसंतराव पाटील वय- 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. कराड, अल्ताफ मगदुम मुल्ला वय- 19 वर्षे, रा. चचेगाव ता. कराड, प्रतिक अजयचंद्र काळोखे वय- 18 वर्षे, रा. सिद्धार्थनगर चचेगाव ता. कराड याना अटक करण्यात आली आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कराड शहरामध्ये तीन इसम कमी किंमतीमध्ये मोबाईल हॅन्डसेट व मोबाईलचे साहित्य विक्री करीत आहेत. सपोनि अमित बाबर व पथकास प्राप्त झाले बातमीचा आशय समजावून सांगून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने नमुद तीन इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किंमतीची मोपेड असा एकुण 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सपोनि अमित बाबर, सपोनि सखाराम बिराजदार, पोलीस अंमलदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी सदरची कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment