Wednesday, January 11, 2023

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून कराडसाठी 10 कोटीचा निधी ; रणजितनाना पाटील यांनी केला पाठपुरावा ;

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थक रणजितनाना पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन करून पाठपुरावा केला आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार व पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचेही याकामी सहकार्य लाभले आहे. 
हा निधी प्रामुख्याने.......शिवाजी हाऊसिंग सोसायटी, प्रकाशनगर, रुक्मिणी इस्टेट,  कृष्णांगण सोसायटी, पाटील नगर, राजाराम नगर व वाढीव भागातील प्रभाग दोनसाठी मंजूर झाला असून लगतच्या काही प्रभागांनाही निधी मंजूर झाला आहे. 

मुख्यमंत्री एकानाथ शिंदे व व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वी येथील नियोजित धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आणखी 10 कोटी रूपये शहरातील विकासकामांसाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे रणजितनाना पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

वैशिष्टय़पूर्ण योजनेनुसार लिबर्टी मजदूर मंडळ कराड येथे इनडोअर कबड्डी स्टेडीयम विकसित करणे 1 कोटी 45 लाख, लिबर्टी मंडळाचे ग्राऊंड, बाल्कनी व जिम्नॅशियम विकसित करणे 1 कोटी 10 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील पवार नगरमधील राजाराम पार्क ते डी. जी. पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील एलआयसी ऑफिस ते विरंगुळा बंगला रस्ता बीएम, बीसी करणे 40 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड 47 नं. डांबाच्या पश्चिमेस हणमंतराव कदम ते गुरुप्रसाद धाबा ते मोहन पाटील वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 95 लाख, शहरातील प्रमुख रस्त्यावर आईज कॅट बसवणे, थर्मोप्लास्टीक पेंट मारणे 50 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाशनगर रोड ते रुक्मिणी इस्टेट ते कृष्णांगण सोसायटी व पाटील नगर, राजाराम नगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सोलर एलईडी पथदिवे बसवणे 90 लाख, प्रभाग 2 मधील कॉटेज हॉस्पिटल ते प्रकाशनगर बिल्डिंग कॉर्नरपर्यंत पूर्व पश्चिम रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 45 लाख,  प्रभाग 2 मधील डॉ. महेश पाटील यांच्या घरापासून कृष्णांगण सोसायटीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 31 लाख, प्रभाग 2 मधील जीवन रेखा पतसंस्थेपासून कलबुर्गी घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख, कामगार चौक ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 85 लाख, प्रभाग 2 मधील कृष्णांगण सोसायटी मधील वीतराग अपार्टमेंटपासून सतीश चव्हाण घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लाख,  प्रभाग 2 मधील सर्वे नं. 69/1 येथील मुळे, गुरसाळे, ओसवाल, शाह बंधू येथील ओपन स्पेसमध्ये गार्डन व ओपन जिम विकसित करणे व प्रभाग 2 मधील वाढीव भाग रुक्मिणी इस्टेटमधील ओपन स्पेसमधील गार्डन विकसित करणे 10 लाख, 2 मधील डॉ. काझी ते राम मंदिर पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 25 लाख, प्रभाग 2 मधील विठामाता हायस्कूल ते पी. पी. शिंदे घर ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 2 मधील वाडीलाल घर ते झोपडपट्टीपर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाढीव भाग वाखाण रोड सुनील पवार घर ते दिलीप गुरव घर ते कलबुर्गी यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड पी. डी. पाटील पार्कमधील घनश्री घरापासून ते हॉलीवूड फोटोग्राफ यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 21 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाश नगरमधील अंतर्गत रस्ते बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील रुक्मिणी इस्टेटमधील अंतर्गत रस्ते करणे बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 1 मधील दत्त मेडिकल ते मोमीन राऊंड बिल्डिंगपर्यंत रस्ता बीएम बीसी करणे 20 लाख, प्रभाग 3 मधील बुधवार पेठ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील खोजा घर ते चव्हाण घरावरून मिया नाना वस्तीपर्यंत रस्ता खड़ीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 5 मधील गुरुवार पेठेतील आशूरखाणा ते मुस्तफा सय्यद घरापर्यंत सार्वजनिक वापराच्या ठिकाणी काँक्रीट करून लादीकरण करणे 10 लाख असा एकूण 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment