वेध माझा ऑनलाइन - सैदापूर ता. कराड येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील यांला 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी विनायक पाटील यांचा शोध घेणे सुरू आहे
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार याने खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणी वर आदेश काढून तशी नोंद धरण्याकरिता व सातबारा उतारा देण्याकरता 15 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. परंतु तडजोडीअंती खाजगी इसम मंगेश उत्तम गायकवाड रा. सुपने, ता. कराड यांच्या कडून 10 हजार रुपये लाच स्वीकारले.पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सातारा पोलीस उप अधीक्षकम श्रीमती उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक राजपुरे व जाधव यांनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment