वेध माझा ऑनलाईन - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याला कारणीभूत ठरलंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान. आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या शिंदे गट आक्रमक झाला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही काय मुर्ख आहोत का : संजय शिरसाट
शिवसेना आमदार संजय शिरसाट यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. त्यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये वाद निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त 48 जागा लढवायला? दोन्ही पक्षातील जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.”, असं म्हणत बावनकुळे यांनी आम्ही महत्त्व देत नाही अशीच काहीशी त्यांची प्रतिक्रिया होती.
No comments:
Post a Comment