Thursday, April 13, 2023

जिल्हाधिकाऱ्यांनी केला 14 एप्रिल हा दिवस मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषित ; राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश ; संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे या दिवशी मद्यपान बंदी दिवस घोषित करावा .या मागणीचे निवेदन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटने कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख ,यांना पाठवण्यात आले होते. तसेच प्रांताधिकारी, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 13 रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रूचेश जयवंशी यांनी मद्यपान बंदी दिवस घोषित केला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिली जिल्हाधिकारी जयवंशी यांनी याबाबतचा आदेश देखील जारी केल्याचे त्यांनी सांगितले

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महारुद्र तीकुंडे यांच्या आदेशाने हे निवेदन सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या शिष्टमंडळाने दिले होते या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे कराड तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड कराड तालुका उपाध्यक्ष मुकेश मोरे कराड शहर अध्यक्ष विकी शहा कराड शहर सरचिटणीस सौरभ गाजी कराड शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला खटाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब मुल्ला सामाजिक कार्यकर्ते सुमित कांबळे राकेश पवार अनिकेत तडाके तोफिक बागवान यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले होते . 
जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले संघटनेच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे संघटनेवर समाजातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे पदाधिकारी कार्यकर्ते आनंदित झाले असून पुढील काम करण्यासाठी एक प्रकारे ऊर्जा मिळाली असल्याचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला म्हणाले

No comments:

Post a Comment