वेध माझा ऑनलाइन - कराडच्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज रविवारी सकाळी सुरुवात झाली सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या एकूण 89 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे नेते अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान सोसायटी मतदार गटात १८६५ मते आहेत, ग्रामपंचायत गटात १९०० तर व्यापारी गटात ३७२ मते आहेत. कऱ्हाड तालुक्यातील मसुर, उंब्रज, कोळे, उंडाळे, काले, कऱ्हाड या मतदान केंद्रावर मतदान झाले आहे.
दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल ८९.३९ टक्के मतदान झाले आहे.
No comments:
Post a Comment