Wednesday, May 31, 2023

गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात ; आता ग्राहकांना किती रुपये मोजावे लागणार ?

वेध माझा ऑनलाइन । महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 जूनला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या किमतीनुसार, कमर्शिअल गॅस सिलिंडर तब्बल 83 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आता 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हे सिलिंडर 1856.50 रुपयांना मिळत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीच्यात दरात मिळणार आहे.

कमर्श‍िअल गॅस स‍िलिंडरच्या नव्या किंमती -
कमर्शिअल गॅस स‍िलेंडर द‍िल्‍लीत 1856.50 रुपयांवरून 1773 रुपयांवर आले आहे. कोलकात्यात ही किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आली आहे. याच प्रकारे मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडरसाठी पूर्वीच्या 1808.50 रुपयांऐवजी आता 1725 रुपये मोजावे लगातील. याशिवाय चेन्‍नईमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत आता 2021.50 रुपयांवरून  कमी होऊन 1937 रुपयांवर आली आहे.

No comments:

Post a Comment