वेध माझा ऑनलाइन ; केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय कुमार मिश्रा सध्या 2 दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यानिमित्ताने कराड शहराच्या वतीने मुंबई गुजरात राजस्थानकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या या कराड रेल्वे स्थानकावर थांबाव्यात या मागणीचे निवेदन ना मिश्रा याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर कडून येणाऱ्या व मुंबई, गुजरात व राजस्थान कडे जाणाऱ्या ट्रेन नं. ११०५० - अहमदाबाद एक्स्प्रेस, ट्रेन नं. १६५३४ - जोधपूर एक्स्प्रेस, ट्रेन नं. २२४९८ - हमसफर एक्स्प्रेस या ट्रेन कराड रेल्वे स्टेशन वरून जात असतात. कराड शहरातील नागरिक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर तसेच विद्यार्थी विशेषत: मारवाडी गुजराती व जैन समाजातील नागरिक व व्यायसायिक व इतर अनेक प्रवासी यांना व्यावसायिक कामकाज तसेच इतर कामांकरता वारंवार मुंबई गुजरात व राजस्थान येथे जावे लागते परंतु सदरच्या ट्रेन कराड येथे न थांबता सातारा येथे थांबवल्या जातात त्यामुळे कराड मधील नागरिकांना नाईलाजाने सातारा रेल्वे स्थानकात वेळी अवेळी उलटा प्रवास करून जावे लागते. वस्तूत: कराड शहरात सदर रेल्वेचा वापर करणारे नागरिक व प्रवासी सातारा येथील प्रवाशांपेक्षा जास्त आहेत त्यामुळे सदरच्या ट्रेन कराड येथील रेल्वे स्टेशनवर किमान एक मिनिटाकरिता थांबवण्यात याव्यात हे नागरिकांच्या सोयीचे आहे म्हणजे नागरिकांना साताराला उलटा प्रवास करून त्याकरिता जावे लागणार नाही नागरिकांच्या सोयीसाठी सदर रेल्वे कराडात किमान एक मिनिट तरी थांबवण्याचा विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे
यावेळी खा उदयनराजे भोसले आमदार व जिल्हाध्यक्ष जयाभाऊ गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा महाराष्ट्र निमंत्रित सदस्य डॉ अतुल भोसले, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी सरचिटणीस प्रमोद शिंदे, तसेच युवा मोर्चा अध्यक्ष विशाल कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment