वेध माझा ऑनलाइन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून कराडकडे यायला रवाना झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सुरुवातीला बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. मात्र किरकोळ दुरुस्ती करुन पुन्हा मुख्यमंत्री कराडकडे येत आहेत
सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी सातारा आणि पाटणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
No comments:
Post a Comment