वेध माझा ऑनलाइन । पुणे, 10 एप्रिल : मान्सूनच्या आगमनाबाबत पुणे हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मान्सून जरी येत्या दोन दिवसांत राज्यात दाखल होणार असला तरी शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी पुढील दहा दिवस तरी वाट पहावी लागणार आहे.
मान्सूनसाठी अनुकूल स्थिती
दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहिल. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला
No comments:
Post a Comment