वेध माझा ऑनलाईन। अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार...
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
किरण लहमाटे
निलेश लंके
धनंजय मुंडे
रामराजे निंबाळकर
दौलत दरोडा
मकरंद पाटील
अनुल बेणके
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी
अदिती तटकरे
शेखर निकम
निलय नाईक
अशोक पवार
अनिल पाटील
सरोज अहिरे
No comments:
Post a Comment