Monday, July 3, 2023

अखेर सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी ; शरद पवारांनी घेतला निर्णय

वेध माझा ऑनलाईन। अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांची पक्षांतरबंदी कायद्याखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी हकालपट्टी केली आहे एक पत्र लिहुन सुप्रिया सुळे यांनी या दोघांच्या हकालपट्टीची  मागणी केली होती 

खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन त्यांना कोणतीही कल्पना न देता शपथविधीस कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या दोन्ही खासदारांवर दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.त्यानुसार शरद पवारांनी या दोन्ही खासदारांची पक्षातून हकलपट्टी केली आहे

No comments:

Post a Comment