वेध माझा ऑनलाइन। भारतीय क्रिकेट संघाने आज आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली असून निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. यंदाचा विश्वचषक भारतात होणार असून ऑक्टोबर महिन्यापासून स्पर्धेची सुरवात होणार आहे. स्पर्धेसाठी संघात किरकोळ बदल केले असून अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांना मात्र संघात स्थान मिळवता आले नाही.
सध्या पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत पूर्ण ताकदिनीशी उतरला आहे. पुढच्याच महिन्यात होणाऱ्या विश्वचषकसाठी भारतीय संघाला या स्पर्धेतून चांगला अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा आयसीसी ट्रॉफीजचा दुष्काळ संपवण्याची भारताला चांगली संधी आहे. ५ ऑक्टोबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार असून सलामीची लढत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने होणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघात फार बदल केले नसून आशिया चषकातील संघाप्रमाणेच हा संघ असेल. फक्त फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला संधी मिळाली असून आशिया चषक संघातील तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान मिळू शकले नाही. आशिया चषक संघातून डच्चू मिळालेल्या यजुवेंद्र चहल विश्वचषक संघात ही स्थान मिळवू शकला नाही. आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून प्रवास करणाऱ्या संजू सॅमसन याला देखील संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय, संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेले फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन यांनादेखील संधी मिळू शकलेली नाही.
नुकतेच दुखापतीतून बाहेर आलेले के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषक स्पर्धेतही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ते सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
No comments:
Post a Comment