वेध माझा ऑनलाइन। - मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे सामंजस्याने निर्णय घ्यायला हवा. पृथ्वीराज चव्हाणही राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालणार नाही. टीकाटिपण्णी करणे सोपे आहे. राज्यात महाआघाडीच्या काळात देण्यात आलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही. तर महायुती सरकारच्या काळातही दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दरम्यान आज मोजक्या गर्दीने उपमुख्यमंत्री अजितदादांचा कराड दौरा पार पडला राष्ट्रवादी फुटली तेव्हा शरद पवार कराडात आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांची शहर व ग्रामीण भागातून उस्फुर्त जमलेली भरगच्च गर्दी पहायला मिळाली होती त्यातुलनेत आज अजितदादांच्या कराड दौऱ्याला गर्दी मोजकीच दिसली दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे शहरातून स्वागत करण्यात आले प्रीतिसंगम घाट येथे स्टेजही घालण्यात आले होते मात्र लोकांची गर्दी जेमतेम असल्याने कदाचित अजितदादा त्याठिकाणी कार्यकर्त्याना संबोधित न करताच पुढच्या प्रवासाला निघून गेले असावेत अशी चर्चा होती...
येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, नितीनकाका पाटील, राजेश पाटील-वाठारकर, राजेंद्र पाटील-उंडाळकर, सुरेंद्र गुदगे, विजय यादव, सादिक इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, मनोज जिरंगे हे कुणबी दाखले देण्याबाबत आग्रही आहेत. दरम्यान, निजामशाहीतील दस्तऐवजांवरून कुणबी उल्लेख असल्याने त्यांना त्याबाबतचे दाखले देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परंतु, मूळ कुणबी आणि ओबीसी यांनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास आमचे काय? असा मुद्दा उपस्थित केला आहे. या सगळ्याचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल. याबाबत मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाबाबत सविस्तर माहिती गोळा करावी लागणार आहे. मराठा समाजातील काही आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांमुळे सर्व समाज प्रगत आहे, असे होत नाही. समाजातील मोठा वर्ग अध्यापही आर्थिक मागास आहे. त्यामुळे अजूनही मागे राहिलेल्या वर्गाला इतरांबरोबर आणण्यासाठी त्यांना आरक्षण द्यावेच लागेल, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे.
ते म्हणाले, काहींचे म्हणणे आहे की, तात्काळ आरक्षणासंदर्भातील जीआर काढावा. परंतु, संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा सामील झाला. त्यावेळी काहींच्या दस्तऐवजांवर कुणबी उल्लेख होता. त्यानुसार सरकारने संबंधितांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला आहे. याबाबत अधिक दस्तऐवज हैदराबादवरून आणावे लागतील. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. परंतु, संयुक्त महाराष्ट्राआधी ज्यांच्या दस्तऐवजांवर कुणबी असा उल्लेख आढळतो. त्यांना दाखले द्यायला काही हरकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, निजामशाहीचे दस्तऐवज मानता आणि छत्रपतींचे मानत नाही? याबाबतचा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाबाबत छेडले असता ते म्हणाले,
पृथ्वीराज चव्हाण हेही राज्याचे मुख्यमंत्री होते. प्रमुख होते. सर्व परिस्थिती त्यांना माहिती आहे. विरोध करणे सोपे आहे. काहीजण म्हणतात, केंद्रात यांचे सरकार आहे, त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु, केंद्रात दहा वर्षे मनमोहनसिंग यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारने का निर्णय घेतला नाही? एकमेकांवर टीकाटिपण्णी, टोलवाटोलवी करून चालणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी, विरोधकांनी एकत्रितपणे सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी.पुढारपण करणाऱ्या आणि विरोधी पक्ष नेते म्हणून मिरवणाऱ्यांनी आंदोलकांना भेटून वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी फुटली तेव्हा शरद पवार कराडात आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांची भरगच्च गर्दी पहायला मिळाली होती त्यातुलनेत आज अजितदादांच्या कराड दौऱ्याला गर्दी मोजकीच दिसली दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे शहरातून स्वागत करण्यात आले प्रीतिसंगम घाट येथे स्टेजही घालण्यात आले होते मात्र लोकांची गर्दी जेमतेम असल्याने कदाचित अजितदादा त्याठिकाणी कार्यकर्त्याना संबोधित न करताच पुढच्या प्रवासाला निघून गेले असावेत अशी चर्चा होती...
No comments:
Post a Comment