वेध माझा ऑनलाइन। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर आज धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील गोषटवाडी हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चारचाकी वाहने, असा 19 लाख 75 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे सदर गुन्हयातील व्यक्ती गोरखनाथ बाबुराव पवार रा.बेलवाडे खुर्द ता.पाटण, प्रदीप कृष्णात सलते रा.मु.सलते पो. बीबी ता.पाटण व दिनेश दगडू कदम रा.वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(इ),81,83,90,103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सकस दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment