Wednesday, October 4, 2023

समता पर्व संयोजन समितीच्या उपोषणास कराडच्या ठाकरे गटाचा पाठिंबा ; ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांची उपोषणस्थळी भेट ;

वेध माझा ऑनलाइन। समता पर्व संयोजन समिती वतीने कराड प्रशासकीय कार्यालय समोर काल पासून अल्पसंख्याक संरक्षण व आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी भारतीय संविधान घेऊन समता पर्वचे नवाजबाबा सुतार, आनंदराव लादे, सलीम पटेल, जावेद नायकवडी, कय्युम मुल्ला, रमजान मांगलेकर, हनीफ मुल्ला, जुबेर पटेल, शोहेब संदे भूषण पाटील, धीरज जाधव, दिपक बाटे आदी समविचारी समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर म्हणाले की उद्धव ठाकरे नेहमीच दलित मुस्लिम समाजाच्या बरोबर आहेत. सरकार लोकशाही गोठण्याचा काम करत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत असं आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते इंद्रजीत गुजर यांनी उपोषण स्थळी आंदोलन करताना दिले आहे

आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते  व नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) कराड शहर प्रमुख शशीराज करपे, कराड शहर उपप्र‌मुख शेखर बर्गे, जिल्हापरीषद उपप्रमुख अमोल कणसे, सरपंच सतीश पालुवाडे राजकुमार पाटील, राकेश पवार - सामाजिक कार्यकते अध्यक्ष सुपन निरज सावंत, शिवसैनीक व इतर शिवसैनिक उपस्थित होते. यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment