आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्ही कधी म्हटलं का ... आम्ही निधी आणला... किंवा आम्ही विकासकामे केली म्हणून... मग आता सरकार आमचे आहे, उपमुख्यमंत्री आमचे आहेत, आणि महत्वाची खाती आमच्या पक्षाकडे आहेत ... मग तुम्हीचं सांगा उत्तर मतदार संघातील कामे आम्ही करतो की विरोधक करतात ? असा उलटा सवाल भाजप चे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज पत्रकारांना विचारला...दरम्यान
कराड उतरचे विद्यमान आमदार पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी कोणाला किती निधी दिला... आता सरकार तुमचे नाही मग तुम्हाला आता निधी कोण देणार ? निधी आणतो म्हणत तुम्हाला पुरावे दाखवावे लागतात...ही वेळ का आली ? राज्यात सरकार आमचे आहे आणि म्हणून आम्ही निधी आणतो...त्यामुळे आम्ही श्रेय घेणारच...असे सांगत धैर्यशील कदम यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली...
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विकासकामे करण्यावरून श्रेयवाद सुरू आहे याविषयीच्या पत्रकारांच्या प्रश्नांवर कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा व कराड दाैऱ्यावर येत आहेत. त्याच्या दाैऱ्याची पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महेश जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघात आज भाजपाची ताकद मोठी असल्याने अजित पवार यांचा गट भाजपाला मदत करेल. कराड उत्तर मतदार संघात भाजप एकत्रित काम करत आहे. तसेच दक्षिणेत डाॅ. अतुल भोसले यांचा गट आहे. पाटण मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहेत. साताऱ्यात दोन्ही महाराज भाजपकडे आहेत. कोरेगाव मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहे. तर वाई मतदार संघात मदनदादा भोसले भाजपचे आहेत, तसेच आ. मकरंद पाटील हे अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे वाई मतदार संघात भाजपाची ताकद मोठी आहे. या सर्व बाबीचा विचार करून सातारा लोकसभा मतदार संघ भाजप कमळ चिन्हावर लढेल असे ते यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment