Friday, October 13, 2023

कराड बाजार समिती व कराड पालिका प्रशासन यांच्यात" ती ' भिंत पाडण्यावरून जोरदार वादावादी ;

वेध माझा ऑनलाइन। कराड बाजार समिती आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात संरक्षण भिंत पाडण्यावरून आज जोरदार वादावादी झाल्याचे पहायला मिळाले

कराड पालिका प्रशासन आज सकाळी पोलिस बंदोबसतात संरक्षण भिंत पाडण्यासाठी दाखल झाले असता समितीचे संचालक, व्यापारी आणि शेतकरी यांनीही घटनास्थळी धाव घेत भिंत पाडण्यास विरोध केला. यावेळी मुख्याधिकारी शंकर खंदारे आणि बाजार समितीचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान कराड बाजार समितीची भिंत हटविण्यासाठी आलेल्या पालिका प्रशासनाकडे कोणताही लेखी आदेश नसल्याने वादावादी झाली. पालिका मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आपल्याला जिल्हाधिकारी यांनी तोंडी आदेश दिला असून लेखी आदेशाची गरज नसल्याचे म्हणत कारवाई करत असल्याचे सांगितले

दरम्यान हायकोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे गेल्या आठ दिवसापूर्वी तीन फूट भिंत हटवली होती. त्यानंतर कराड शहरातील त्रिशंकू भागातील नागरिकांनी तीन फूट ऐवजी 40 फूट भिंत हटविण्यासाठी कराड पालिकेत आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे संरक्षण भिंत हटविण्याच्या आदेशा विरोधात बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी गेल्या 4 दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. अशातच आता पालिका प्रशासनाने 20 फूट भिंत हटविण्याचा निर्णय घेतल्याने आज वादावादी ची परिस्थिती निर्माण झाली

No comments:

Post a Comment