Tuesday, February 27, 2024

ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं, आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' मुख्यमंत्री शिंदे कोणाबद्दल म्हणाले?'

वेध माझा ऑनलाईन
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं असतानाच  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं.  आज 27 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. सभागृहाच्या कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंदरम्यानच्या दरम्यान एक संवाद झाला त्याची सध्या जोरदार चर्चा आहे

नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. दोन्ही नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे एका हाताने चष्मा सरळ करत असताना...
 नाना पटोले, 'हे काय चाललंय? तुम्हीच त्यांना मोठं केलंय,' असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हातवारे करुन उत्तर देताना दिसत आहेत.

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं उत्तर...म्हणाले...
नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, 'ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' असं अगदी हातवारे करुन सांगतात. 

मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा संवाद व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतरही नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांशी हसून काहीतरी बोलतात. मात्र व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादामधील शेवटची काही वाक्य स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. तरी या दोघांमधील ही चर्चा नेमकी कोणाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

No comments:

Post a Comment