वेध माझा ऑनलाईन। लायन्स क्लब ऑफ कराड मेन व कलबुर्गी स्टेम्पींग यांचे संयुक्त विद्यमाने ओगलेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते.यावेळी 75 जणांनी रक्तदान केले.यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचेवतीने सर्व सोय करण्यात आली होती.
यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे म्हणाले की जगात सर्वश्रेष्ठ दान कोणते असेल तर ते रक्तदान आहे.यामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.सध्याच्या युगात विज्ञान कितीही प्रगत असले तरी रक्त तयार करण्याचा कारखाना कोणी बनवू शकत नाही.रक्त तयार होणे एक दैवी प्रक्रिया असून त्याचा वापर इतरांचे जीव वाचवण्यासाठी होणे आवश्यक आहे.तरी प्रत्येकानी दर तीन महिन्यांनी रक्तदान
करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी हजारमाचीचे उपसरपंच कदम , सदस्य माने ,कराड लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मावजी पटेल,क्लबचे संदिप पवार, प्रविण भोसले, मिलिंद भंडारे, कलबुर्गी स्टेम्पींगचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment