Tuesday, May 21, 2024

कराडच्या यशवंत बँकेच्या चौकशीचे आदेश: ...आणखी दोन बँकांसह 39 जणांची चौकशी होणार ... माझ्या आधार कार्ड, पॅन कार्डचा गैरवापर केला गेला... माझ्या खोट्या सह्या केल्या ; तक्रारदार गणेश पवार यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
बनावट जामीन प्रकरणी यशवंत को.ऑप बँक लि.फलटण शाखा चावडीचौक कराड, दि चिखली अर्बन को.ऑप बँक लि.चिखली, यवतमाळ अर्बन को.ऑप बँक लि.यवतमाळ या तीन बँकेच्या संचालक, चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी अशा 39 जणांच्या चौकशीचे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती ॲड.एन.पी.जाधव यांनी दिली.
दरम्यान माझे कराडच्या यशवन्त बँकेत खाते होते... त्याठिकाणी असणाऱ्या माझ्या इनोसीचा, आधार कार्ड, पॅन कार्डचा गैरवापर केला गेला... तसेच माझ्या खोट्या सह्या केल्या गेल्या... असा गंभीर आरोप तक्रारदार गणेश पवार यांनी यावेळी केला कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते (मंगळवारी) बोलत होते. 

यावेळी बोलताना ॲड.एन.पी. जाधव म्हणाले,  कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांच्या दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आदेशामुळे या तीन बँकांच्या बनावट कर्ज प्रकरणी 39 जणांच्या चौकशीचे आदेश पोलीसांना प्राप्त झाले. रविवार पेठ, कराड येथील रहिवाशी गणेश शिवाजी पवार यांच्या बनावट व खोट्या सह्या मारुन 8 कोटी 55 लाख रुपयांचे कर्ज बनावट कंपनी स्थापन करुन 3 बँकांचे कर्ज चार आरोपींनी बोगस कंपनीव्दारे मिळवले होते. या प्रकरणी फिर्यादी गणेश पवार यांची प्राथमिक फिर्याद कराड येथील मे. प्रथम वर्ग न्या.एम.व्ही भागवत यांच्या कोर्टात दिनांक 19 मे 2023 रोजी दाखल केली होती. त्यावर कोर्टाने चौकशीचे आदेश सी.आर.पी.सी 156 (3) अन्वये दिले होते. त्यावर यशवंत को. ऑफ बैंक लि.फलटणचे चेअरमन शेखर सुरेश चरेगांवकर यांनी कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे क्रिमीनल रिव्हीजन अर्ज नं.8/2023 असा दाखल केला होता. त्यामध्ये फिर्यादी गणेश पवार यांच्यावतीने ॲड.निलेश जाधव यांनी काम पाहिले. फिर्यादी यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुरावे इत्यादीचे अवलोकन करुन जिल्हा व संत्र न्यायालयाने खालील कोर्टाचा आदेश कायम केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी सुमारे 39 जणांच्या विरोधात प्राथमिक फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी गणेश पवार यांनी त्यांच्या बनावट सह्या वैभव विलास कुलकर्णी, विठ्ठल गोविंद कुलकर्णी, अश्विनकुमार सुरेंद्र काळे, सुकृत सुरेंद्र काळे इत्यादीनी करुन रक्कम रुपये 8 कोटी 55 लाखाचे कर्ज समभाग कर्ज योजनेअंतर्गत 1) यशवंत को. ऑप बँक लि. फलटण शाखा चावडी चौक, कराड रक्कम रुपये 1 कोटी 80 लाख 2) चिखली अर्बन को.ऑप बँक लि. चिखली ता. चिखली, जि. बुलढाणा, रक्कम रुपये 4 कोटी 75 लाख 3) यवतमाळ अर्बन को. ऑफ बँक लि. यवतमाळ रक्कम रुपये 2 कोटी असे कर्ज कोणतीही चौकशी न करता, अनियमितपणे, पुरेशी तारण मिळकत न घेता तसेच कर्जदार व जामीनदार यांची प्राथमिक चौकशी न करता, कर्जदार व जामीनदार यांचे इन्कम टॅक्स रिटर्न न घेता कर्ज प्रकरणासाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे, के. वाय.सी इत्यादी बाबींची पुर्तता न करता नियमबाह्य कर्ज तीन बँकांनी दि.26 जुन 2020 रोजी बनावट कंपन्यांना कर्ज अदा केले होते. सदरचे कर्ज घेतल्यापासून थकीत होते. सदर कर्जाचा एकही हप्ता कर्जदार यांनी भरलेला नाही. कर्जास तारण दिलेली मिळकत परस्पर यशवंत को.ऑफ बँक लि. फलटण, शाखा चावडी चौक कराड यांची एन.ओ.सी घेवून व इतर 2 बँकांची फसवणूक करुन कर्जदार यांनी कर्जास तारण दिलेल्या मिळकती त्रयस्थ इसमास विकल्या आहेत. कर्जास तारण दिलेल्या मिळकतीवरती 7/12 सदरी कर्जदार यांनी मुद्दाम बोजा चढविलेला नव्हता. त्यामुळे आणखी 3 ते 4 लोकांची फसवणुक झाली आहे.
3 बँकानी नियमबाह्य कर्ज दिल्यामुळे त्या कर्जाची वसुली झाली नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण होत नाही. फिर्यादी यांनी सदरची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. कर्जदार वैभव विलास कुलकण व विठ्ठल गोविद कुलकणी यांनी अनेक बँकांना अशाच प्रकारे फसवले असल्याचे पुराव्यानिशी कोर्टामध्ये सांगितले. त्यामुळे मे. कोर्टाने 39 जणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये खरा सुत्रधार कोण आहे हे शोधून काढणे हे पोलीसांचे समोरील आव्हान आहे. सदरचे फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांवरती फार मोठा दबाव होता. सदरचे कर्ज प्रकरण हे 8 कोटी 55 लाख रक्कमेचे आहे. यामध्ये फिर्यादीसह अनेक लोकांच्या खोट्या व बोगस सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे फिर्यादी गणेश पवार यांना कोर्टात जावून आदेश प्राप्त करुन घ्यावा लागला. असे ॲड.एन.पी.जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment