Tuesday, May 28, 2024

...अन्यथा उद्याच पालिकेला टाळेठोक आंदोलन करणार; त्या अधिकाऱ्यांना काळे फासणार... ; राजेंद्रसिंह यादव यांचा पत्रकार परिषदेत इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत सव्वादोन वर्षापुर्वी संपली आहे तेव्हापासून त्याठिकाणी प्रशासक कार्यरत आहे या प्रशासनावर अंकुश नसल्याचे चित्र असल्याने याठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांची बेदरकार वृती वाढीस लागली आहे वेळेत लोकांची कामे न होणे लोकांकडून पैशाची मागणी होणे अशा वृत्तीने या अधिकाऱ्यांकडून काम सुरू आहे त्यामुळे कराडकर त्रस्त झाले आहेत या संबंधित अधिकाऱ्यांची उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जर बदली झाली नाही... तर... कराड पालिकेला टाळे ठोक आंदोलन करणार... तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा यशवन्त विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.यावेळी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते

यादव म्हणाले... कराडकर नागरिकांना या सगळ्या कारभाराचा त्रास होत आहे त्यामुळे आम्ही ही आक्रमक भूमिका घेतली आहे राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना या कारभाराबाबत सखोल माहीती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी आपल्याकडे प्रशासनाच्या या गलथान कारभाराचे पुरावे असल्याचे सांगूनकराड नगरपरिषदेच्या एकूणच सर्व खात्याची खातेनिहाय सखोल चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी यादव यांनी केली 

एकूणच या पत्रकार परिषदेत राजेंद्रसिह यादव यांनी कराड पालिकेच्या अधिकाऱ्यांचा चालू असलेला मुजोरपणा आणि भ्रष्टाचाराची चांगलीच पोलखोल केली खरी...मात्र जाता जाता या सगळ्या कारभारामागचा बोलावता धनी कोण आहे... असा सवाल त्यांनी यावेळी बोलता बोलता केल्याने सर्व उपस्थितांच्या भुवया उंचावल्या... आणि... या अधिकाऱ्यांचा करता- करवीता धनी कोण असावा... ... अशी आता चर्चा सुरू झाली आहे...

शंभूराज देसाई यांचा हस्तक्षेप योग्यच...
दरम्यान, पालकमंत्री ना शंभूराज देसाई हे कराड पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात असा आरोप यापूर्वी झाला होता त्याचे उत्तर देताना श्री यादव म्हणाले...पालकमंत्री म्हणून त्यांचा तो अधिकार आहे... ना शंभूराज देसाई यांचा कराड पालिकेतील हस्तक्षेप कराडच्या विकासासाठी होत आहे... पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शहराला भरभरून निधी देत इथल्या विकासासाठी केलेला हस्तक्षेप योग्यच आहे  

No comments:

Post a Comment