Sunday, June 23, 2024

कोयना धरणात 2 दिवसात किती आहे पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.24 टीएमसी इतका झाला असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 15 आणि महाबळेश्वरला 15 मिलीमीटरची नोंद झाली आहे. 

सातारा जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागात यंदा धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे.सध्या जमिनीला वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही. परिणामी खरीपातील पेरणी यंदा १०० टक्के होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसापासून पूर्व भागात पाऊस कमी झाला असलातरी पेरणीसाठी अडचणी येणार नाही. तर पश्चिमेकडे पावसाचा जोर आहे.
कास, बामनोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर यासह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तसेच पश्चिमेकडील धरण क्षेत्रातील पाऊस सुरू आहे .यामुळे धरण पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगर येथे 68 तर नवजाला 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरलाही 60 मिलिमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 522, नवजा 668 आणि महाबळेश्वरला 436 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसात कोयना धरणात एक टीएमसीने वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग मागील काही दिवसापासून बंद आहे.

No comments:

Post a Comment